ठाणे विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा ठाणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणदिनाचे औचित्य साधून यशवंतरांव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र ठाणे, कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती मुंबई - ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे आणि मुंबईकरांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन या दोन स्पर्धां आयोजीत करण्यात आल्या आहेत. यातील वक्तृत्व स्पर्धा दिनांक २२ ऑगस्ट रोजी एम. एच. हायस्कूल, ठाणे येथे दुपारी १ वाजता घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेचे नियम आणि तपशील माहितीसाठी विभागावार दिलेल्या संपर्क क्रमांकावरती व्हाट्सअॅप माध्यमातून संपर्क साधावा. वक्तृत्व स्पर्धा - गट १ - ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट - इयत्ता - नववी ते बारावी ) १) सारे भारतीय माझे बांधव आहेत ? २) मालिकांमधील दाखवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि समाज ३) स्मार्ट फोनच्या जमान्यात माणसं विचारांनी स्मार्ट झालीत का ? ४) आवरा त्या प्लास्टिकच्या विळख्याला. ५) आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाची गरज. (संपर्क क्रमांक - ९८७०५ ८८६८२) वक्तृत्व स्पर्धा - गट २ - ( पदवी गट - प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष कला , वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी, मेडिकल वा अन्य शाखा BMS BMM) १) डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी भारतीय समाजासाठी दिलेले योगदान २) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ग्रंथसंपदा ३) कधी साकारेल का आरक्षण विरहित भारत ? ४) जातीसाठी घालवावा का जीव आपला ? ५) होय, भावना डिजिटल होतायत. (संपर्क क्रमांक - ८८९८५ ५३४९५)

संवाद लेखन स्पर्धा : गट १ = ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट - इयत्ता - नववी ते बारावी ) १) जातीविरहित भारत याबाबत भारतमाता आणि भारतीय नागरिक यांच्यातील संवाद २) कोणत्याही प्रवेश अर्जामध्ये जात धर्म याबाबत होणा-या उल्लेखाबाबत मित्र मैत्रिणींमधील संवाद ३) गावातील बळी प्रकार थांबविण्याबाबत गावातील प्रतिष्ठित मांत्रिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य यांच्यातील संवाद. ४)प्लास्टिक बंदीबाबत सकारात्मक - नकारात्मक विचार करणाऱ्या तरुणांतील संवाद. ५) व्हाटसपवर येणाऱ्या संदेशापाठीमागे असणारी प्रचंड कल्पनाशक्ती याबाबत मित्र मैत्रिणींमधील संवाद. संपर्कक्रमांक - ७७३८९ ५४७०८ संवाद लेखन स्पर्धा = गट २ - ( पदवी गट - प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष कला , वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी, मेडिकल वा अन्य शाखा BMS BMM ) १) देशाच्या अस्थिरतेबद्दल लढवय्या सैनिक आणि बळीराजा यांच्यातील संवाद. २) समाजाला पोखरणाऱ्या अंधश्रद्धेबद्दल श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संवाद. ३) आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्यांंबाबत शिवाजी महाराज आणि मावळे यांच्यातील संवाद. ४)ढोलताशे बडवणारी संस्कृती निर्माण होतेय याबाबत ज्येष्ठ नागरिक आणि युवावर्गाशी संवाद. ५)करिअरच्या वाटेवर शिक्षण मूल्यांचा अभाव असलेली पिढी जन्माला येतेय याबाबत समाजसुधारकांचा तरुणांशी झालेला संवाद . (संपर्क क्रमांक - ८१०८२ ४७०७४) स्पर्धेचे नियम : (वक्तृत्व स्पर्धेसाठी नियम ) १) कोणत्याही स्पर्धेत एका शाळेचे वा महाविद्यालयाचे २ स्पर्धक असावेत. २) वक्तृत्व स्पर्धेसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक साठी ५ मिनिटे तर पदवीसाठी ७ मिनिटांचा कालावधी आहे. ३) स्पर्धेच्या वेळी स्पर्धकाकडे शाळेचे महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक आहे. ४) स्पर्धेसाठी आपली नावे - माध्यमिक - उच्च माध्यमिकगटासाठी ( शुभांगी विरकर -९८७०५ ८८६८२ ) पदवीगटासाठी ( कमलेश भिसे ८८९८५ ५३४९५ ) यांच्याकडे व्हाटसएपवरती २० ऑगस्ट पर्यंत द्यावीत. त्यानंतर नावनोंदणी करायची असल्यास याच समन्वयकांशी संपर्क साधावा. ५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ६)काही शंका असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हास्टप द्वारा संपर्क साधावा. ७)वेळेत हजर राहणे अत्यावश्यक. पारितोषिके : रोख पारितोषिक + पुस्तकभेट + प्रमाणपत्र बुधवार : दिनांक २२ ऑगस्ट २०१८ - दुपारी १.०० वाजता स्थळ : एम एच हायस्कूल , ठाणे संवाद लेखनासाठी नियम : १) संवाद लेखन इमेल वर पाठवायचे आहे - वैभव मेल आणि नंबर - ७७३८९ ५४७०८ vpadave7@gmail.com , रुपाली मेल आणि नंबर - ८१०८२ ४७०७४ rupalipinjan@gmail.com २) मेलवर संवादलेखन पाठवताना ते टाईप केलेले असले तर उत्तम... पण त्यासोबत font ही पाठवावा. ३) जर टाईप करुन पाठवता येणे शक्य नसेल तर उत्तम हस्ताक्षरात कागदावर लिहून त्याचा क्लिअर फोटो पाठवावा.. ४) संवादलेखन करताना चार पेक्षा जास्त पात्र नसावीत.. ५) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्यासाठी २०-२५ संवाद असावेत. तर पदवीगटासाठी ३०-३५ संवाद असावेत. साधारण ३-४ फुलस्केप असावेत. ६) संवाद पाठविण्याची अंतिम तारीख १८ आँगस्ट आहे.. त्यानंतर पाठवायचे असल्यास संबंधित समन्वयकाशी संपर्क साधावा. ७) संवादलेखन पाठवताना त्यासोबत विद्यार्थ्याचे नाव , पत्ता, शाळा / महाविद्यालयाचे नाव, वर्ष, इयत्ता, संपर्क नंबर , पाठवणे अत्यावश्यक आहे. ८) काही शंका असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा..किंवा deepathanekar73@gmail.com या मेलवर शंका विचाराव्यात. ९) निकाल आपल्याला फोन करून कळविला जाईल आणि पारितोषिक वितरणासंबंधीसुद्धा आपल्याला मेल केला जाईल. पारितोषिके : रोख पारितोषिक + पुस्तकभेट + प्रमाणपत्र ठाणे आणि मुंबईतील अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रा. दीपा ठाणेकर, श्री निखिल मोंडकर आणि श्री. अमोल नाले यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - ठाणे