यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या ठाणे केंद्राचा 'मुशायरा' या मराठी, हिंदी तसेच उर्दू गझल गायन कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय, तिसरा मजला, गोखले रोड, ठाणे येथे रविवार दि. ११ जून २०१७ रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री. मुरलीधर नाले, उपाध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर तसेच खजिनदार श्री. जवकर यांनी आणि निमंत्रितांच्या साक्षीने स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर संस्थेचे सचिव श्री. अमोल नाले यांनी संस्थेची ध्येयधोरणे सांगून 'मुशायरा' या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांविषयीची थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली. या सर्व मान्यवरांचा संस्थेच्या कार्यकारीणीकडून अध्यक्षांच्या हस्ते शाल तसेच पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन आरेकर यांनी केले. ख्यातनाम उर्दू गझलकार श्री इरफान जाफरी यांच्या उर्दू गझलांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी हिंदी गझलकार श्रीमती सुलभा कोरे तसेच श्री लक्ष्मण शर्मा यांनी आपल्या गझलांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. सदर कार्यक्रमास मराठी गझल सादर करण्यासाठी श्री. डॉ. महेश केळुस्कर, श्री. प्रशांत मोरे, श्री. शशीकांत तिरोडकर तसेच प्रा. श्रीमती प्रतिभा सराफ अश्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव श्री. अमोल नाले यानी संस्थेच्या वतीने मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले.