जुलै २०१६ रोजी ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी सुप्रसिद्ध नाटककार, लेखक, दिग्दर्शक श्री. अशोक समेळ यांची मुलाखत घेतली. हा कार्यक्रम सहयोग मंदिर सभागृह, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला होता. प्रा. श्री. अशोक बागवे यांनी त्यांच्या खुसखुशीत भाषेत श्री. अशोक समेळ यांच्या नाटक, कादंबरी लेखनावर मुलाखत घेतली. ती खुपच छान रंगली. त्यानंतर अशोक समेळ यांनी नटसम्राटमधील शेवटचा उच्चांकाचा प्रवेश सादर केला व सर्व सभागृह नटसम्राटमय असे भारित करून टाकले. यासोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या अखिल महिला परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सुषमा शेंडे यांनी प्रकट मुलाखत प्रा. नितीन आरेकरांनी घेतली व त्यांच्या महिलांच्याविषयक कार्याची ओळख मुलाखतीद्वारा पटवून दिली.