सोलापूर, ३१ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई , विभागीय केंद्र सोलापूर तर्फे रविवार दिनांक सकाळी ९.३० ते ५ या वेळेत 'सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सोलापूर विभागीय केंद्राचे सचिव दिनेश शिंदे यांनी दिली. कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील पर्जन्यमान, मान्सून आणि तदनुषंगिक विषयावर विविध मान्यवर विचार मांडतील. कार्यशाळेचे समन्वयक जल अभ्यासक रजनीश जोशी असतील. सदर कार्यशाळा मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, डफरीन चौक येथे होईल. कार्यशाळेचे उदघाटन सकाळी साडेनऊ वाजता होईल. यावेळी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील डॉ. सतीश काशीद 'अवर्षणप्रवण सोलापूर जिल्ह्यातील मान्सून अंदाज' या विषयावर, रजनीश जोशी 'सोलापूर जिल्ह्यातील ५० वर्षांतील पर्जन्यमान आणि पुढील वाटचाल' या विषयावर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ मयुरेश प्रभुणे (पुणे) हे 'पर्जन्यछायेच्या प्रदेशातील मान्सून' या विषयावर, डॉ. अप्पासाहेब पुजारी (सांगोला) हे 'अवर्षणप्रवण क्षेत्रातील पीकपद्धत' या विषयावर विचार मांडतील असेही दिनेश शिंदे यांनी सांगितले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर