सोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र सोलापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी कार्यक्रमांतर्गत अक्षय इंडिकर दिग्दर्शित उदारणार्थ नेमाडे हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मा. दिलीप सोपल साहेब सदस्य-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच मा. अक्षय इंडिकर दिग्दर्शक प्रमुख पाहूणे, डॉ. सदानंद भिळेगांवकर अध्यतक्ष रोटरी क्लब, डॉ. शरद पाटील अध्यक्ष-लायन्स क्लब, मा. संतोष ठोंबरे अध्यक्ष-मातृभूमी प्रतिष्ठान, मा. गणेश भंडारी अध्यक्ष-मायबोली प्रतिष्ठान, सौ. वैभवी बुडूख अध्यक्ष-लायनेस क्लब आणि मा. नागेश अक्कलकोटे अध्यक्ष-आनंदी यात्री प्रतिष्ठान यांची प्रार्थनिय उपस्थिती असेल.
शनिवारी दिनांक ५ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन बार्शी उद्घाटन समारंभ होईल. त्यानंतर तिथे उदारणार्थ नेमाडे हा चित्रपट दाखवला जाणार आहे. रविवारी दिनांक ६ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता भारत टॉकीज, दामाजी रोड, मंगळवेडा येथे उदारणार्थ नेमाडेचा दुसरा शो दाखवण्यात येणार आहे. सोमवारी दिनांक ७ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता कॉलेज ऑफ फार्मशी (शिवदारे कॉलेज). जुळे सोलापूर येथे उदारणार्थ नेमाडेचा तिसरा शो दाखवण्यात येणार आहे.