सोलापूर विभागीय केंद्र आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईतर्फे पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या शुभहस्ते प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांना हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा.का.किर्लोस्कर सभागृहात प्रदान करण्यात आला रोख रु. १५,०००/- मानपत्र शाल व श्रीफळ व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गो. मा. पवार होते.
देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या साहित्यावर संशोधनावर केल्यामुळे डॉ. बाबासोहब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना पीएचडी ही पदवी बहाल केली आहे. चव्हाण साहेबांच्या साहित्यावर पीएचडी करणारे देशमुख हे पहिले पीएचडी धारक आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यावर त्यांचे ३ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्धी निमित्त त्यांनी महाराष्ट्रात ३०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या एकूण साहित्य सेवेबद्दल त्यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देण्यात येत असल्याचे मा. दत्ता गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्र निर्मितीचा पाया आणि यशवंतराव चव्हाण या विषयावर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी सखोल माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. या प्रसंगी विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष राजशेखर शिवदारे सदस्य युन्नुसभाई शेख, दत्ता गायकवाड, राहुल शहा, दीपक साळुंखे आणि प्रकाश येलगुलवार यांच्यासह साहित्य कला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी या समारंभात उपस्थित होते.