सोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान आयोजन केले असून गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता. शिवाजी महाविद्यालय, हॉल नं. १४, बार्शी, जि. सोलापूर येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. बी.वाय. यादव, अध्यक्ष, श्री. शि. शि. प्र. मंडळ, बार्शी, मुख्य वक्ते म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र दास, ज्येष्ठ साहित्य, यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनमूल्यांचे अभ्यासक तसेच श्री. जयकुमार शितोळे, श्री. नंदकुमार जगदाळे, श्री. पी.टी.पाटील, श्री. ए.पी. देबडवार प्रमुख उपस्थिती असणार आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर