स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त विभागीय केंद्र सोलापूरच्या वतीने गुरुवार दि. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी ग्रामीण भागीतील मुलींचे हिमोग्लोबिन, रक्तगट व प्लेटलेट्स तपासणीचे शिबीर आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर या विषयावर डॉ. सुदेश दोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वयात येणाऱ्या मुलींना आरोग्याच्या दृष्टीने भेडसावणाऱ्या व अर्धवट माहितीने विचलित झाल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा कसा सामना करायचा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १५० मुलींनी यात सहभाग नोंदविला होता. यापुढे प्रत्येक तालुक्यात खा. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पेनेतील हा उपक्रम राबविला जाणार आहे. शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक मुलीला विभागीय केंद्राच्या वतीने रक्तगट हिमोग्लोबिन व इतर तपासणी केल्याचे कार्ड देण्यात येणार असून प्रत्येक मुलीस योग्य ते मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांकडून केले जाणार आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विभागीय केंद्राचे सदस्य राहुल शहा, संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा चे शिक्षक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच या शिबिरास योग्य स्वरूप देण्याचे मोलाचे काम सोलापूरचे प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. संदेश कादे हे करत आहेत तसेच बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरीचे सिद्धेश्वर कुर्ल, ओदुम्बर होमकर व किशोर बुधाराम हे कायम स्वरूपी सहकार्य करणार आहेत. हा उपक्रम प्रतिष्ठानचे सोलापूर विभागीय केंद्र व रत्नप्रभा सोशल फौंडेशन मंगळवेढा यांच्या सयुंक्त विद्यमाने घेण्यात आला होता