यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आगामी पाच वर्षांत १,००० फेलोज घडवून महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय बदल घडवण्याचा निर्धार कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला. आदरणीय पवार साहेबांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त आयोजित फेलोशिप प्रदान सोहळ्यात यंदा कृषी, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील ११३ गुणवंत तरुणांना मान्यवरांच्या हस्ते फेलोशिप प्रदान करण्यात आली. केवळ एका वर्षापुरते मर्यादित न राहता, पुढील काळातही या फेलोजच्या पाठीशी उभे राहून मार्गदर्शन केले जाईल, तसेच महिला सक्षमीकरणासाठी लवकरच विशेष ‘महिला फेलोशिप’ सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे आभार मानत, तंत्रज्ञानाच्या युगात माणसे जोडण्याचे हे कार्य अविरत सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.