डॉ. दिलिप गरुड लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुस्तकावर प्रश्नमंजुषा
२४ सप्टेंबर २०१६ (शनिवार) रोजी...
पुणे विभागीय: केंद्रामार्फत दरवर्षी, इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यासाठी एखाद्या राष्ट्रीय पुढा-याचे आत्मचरित्रावर प्रश्न मंजुषा आयोजित केली जाते. यंदा राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉ. गरुड लिखित पुस्तकावर ही परिक्षा घेण्यात येत आहे.
शाळांना प्रतिष्ठानने या पुस्तकाच्या प्रत्येकी पाच मोफत प्रती वाटल्या आहेत. त्या शिवाय संबंधित शाळातील ९३ शिक्षकांना भिडे परिवार ( मंगेशी) यांनी या पुस्तकाच्या प्रती मोफत वाटल्या आहेत हे पुस्तक प्रतिष्ठानने लिहून घेतले असून आजवर त्याच्या २००० प्रतीची प्रथम आवृत्ती पूर्णपणे खपली असल्याचे प्रकाशकांकडून समजते. सदर पुस्तकांवर आधारित "प्रश्नमंजूषा" प्रश्नोत्तराच्या २९४६ प्रती ५७ शाळांमधून आजपावेतो प्राप्त झाल्या असून, अंदाजे ७५ शाळांमधील ३५०० विद्यार्थी या प्रश्नमंजूषा कार्यक्रमांत भाग घेतली अशी अपेक्षा. सदर पेपर तपसणीचे काम चालू असून साधारणपणे यांतून २०० गुणवान विद्यार्थ्यांची निवड करण्यांत येईल. त्यांना प्रत्येकी रु. १००/- चे शैक्षणिक साहित्य वाटण्यात येईल.
शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०१६ रोजी कै. डॉ. वसंतदादा पाटील विद्यानिकेतन या प्रशालेत या दोनशे विद्यार्थी व सहभागी शाळेचा प्रत्येकी एक शिक्षक वा शिक्षक पालक संघासाठी एक दिवसाचे शिबीर आयोजित केले आहे. त्यामध्ये २०० विद्यार्थ्यांची परिक्षा घेऊन पत्येकी ७वी, ९वी तर्फे प्रथम रु. ५००/-, द्वितीय रु ४००/-, तृतीय रु. ३००/- व उत्तेजनार्थ प्रत्येकी रु. २००/- प्रत्येकी पाच पारितोषिके त्याच दिवशी वाटण्यांत येणार आहेत.
त्याशिवाय तज्ञांची खालील विषयावर व्याख्यानेही आयोजिण्यांत येत आहेत.
१. टीन एजर्सचे मनांत २. बुद्धी वर्धन (मन:शक्ती ) ३. आरोग्यम् धनसंपदा याशिवाय राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब या विषयावर प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण अन्य सेवक यांचेकडून दोन हजार शब्दसंख्या मर्यादेपर्यंचे निबंध मागविण्यात आले आहेत. त्यातील प्रथम क्र. रु. १०००/-, द्वितीय क्र रु. ७५०/-, तृतीय क्रमांक ५००/- उत्तेजनार्थ रु. ४००/- अशी पारितोषिके वाटली जातील.