यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने व इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, ठाणे यांच्या सहकार्याने 'संतांचे मानसशास्त्र' या विषयावर ज्येष्ठ मनोविकास तज्ज्ञ डॉ. आंनद नाडकर्णी हे शनिवार दिनांक १८ जून २०२२ रोजी सायंकाळी ५ ते ६:३० या वेळेत उद् - बोधक आणि रोचक निरूपण करणार आहेत.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मागील शतकांपासून अनेक संत-महात्मे होऊन गेले, त्यांनी अध्यात्मक्षेत्रामध्ये जशी वैचारीक भर घातली, त्याच प्रकारे ' भक्ती ' या संकल्पनेलाही प्रभावी आयाम दिले. समता आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार केला. या सर्व गोष्टींचा मनोव्यापाराकडे आधुनिक मानसशास्त्र आणि मेंदुविज्ञानाच्या द्दष्टीकोनातून कसे पाहता येते यावर डॉ. आनंद नाडकर्णी आपल्याशी संवाद साधणार आहेत.
तरी आपणांस विनंती आहे की या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे!
निमंत्रक,
सुप्रिया सुळे