यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या वेळी जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी महानोरांच्या साहित्य, शेती आणि पाणी क्षेत्रातील अष्टपैलू योगदानाचा गौरव केला. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, शेती-पाणी क्षेत्रासाठी साधना वर्तक व कुसुम राहसे, तर साहित्य क्षेत्रासाठी अविनाश पोईनकर, वैभव देशमुख, सुचिता खल्लाळ आणि हिना कौसर खान यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमंत्रक व चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी महानोरांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्याचा आणि त्यांच्या मूळ गावाला स्मारकाचे रूप देण्याचा मानस व्यक्त केला. या सोहळ्यास चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, सरचिटणीस हेमंत टकले, विश्वस्त विवेक सावंत यांच्यासह महानोर कुटुंबीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
26 सप्टेंबर 2025