यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र परभणी व चतूरंग प्रतिष्ठान परभणी तर्फे दि.१२ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची १०७ वी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे परभणी केंद्रातर्फे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विलास पानखेडे (कार्याध्यक्ष, परभणी केंद्र) तर प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विरसे उपस्थित होते. या कार्यक्रमात सुरवातीस स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते शिवाजी विरसे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जिवनातील विविध घडामोडी, बालपण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग, त्यांचा राजकीय प्रवास, या सारख्या ईतर अनेक घडमोडी उपस्थित प्रेक्षकासमोर मांडल्या. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोम विलास पानखेडे यांनी केला. या कार्यक्रमाची प्रस्तावना तथा सुत्रसंचालन विष्णू वैरागड तर आभार प्रदर्शन प्रदिप चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी चतुरंग प्रतिष्ठानचे विलासराव चट्टे, अमोल क्षीरसागर, टेकाळे व ईतर मान्यवर तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, परभणी केंद्राचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या अभिवादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.