यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केन्द्र परभणी व आरोग्य विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने"महिला आरोग्य तपासणी शिबिर" आज दि. २८/०१/२०१९ रोजी परभणी जिल्हातील पिंगळी येथिल ग्रामीण रूग्णालयात ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उदघाटनाल अध्यक्ष म्हणून मा.सौ.संध्याताई दूधगावकर(अध्यक्ष,विभागीय केन्द्र परभणी)तर उदघाटक म्हणून मा.सौ.भावनाताई नखाते(उपाध्यक्ष तथा आरोग्या सभापती,जि.प.परभणी) तर या शिबीरास महिलाची आरोग्या तपासणी करण्यासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून मा. डॉ. स. मोबिन(वैद्यकीय अधिकारी,ग्रामीण रुग्णालय,पिंगळी) मा. डॉ. कच्छवे मॅडम (स्त्री रोग तज्ञ,परभणी) मा.डॉ.भालेराव (बाल रोग तज्ञ,परभणी) यानी शिबीरास आलेल्या महिलांचे हिमोग्लोबिन,गरोदर मात,बालकाची तपासणी करून सल्ला व माग॔दशन केले.या प्रसंगी ५०० महिला व १०० बालकाची तपासणी करण्यात आली आहे.या शिबीरास पिंगळी सर्कल मधिल महिला व गरोदरमाता व बालक मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यासाठी उपस्थितीत होत्या.या प्रसंगी शिबीरास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणीचे मा.विलासजी पानखेडे,मा.सुमंत वाघ व मा.प्रशांतजी दलाल यांनी सदिच्छा भेट दिली. सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी पिंगळी येथील आरोग्य केन्द्राचे सव॔ परिचारीका व कम॔चारी यांनी परिश्रम घेतले.तर सदर शिबीरा मा.विजयरावजी कान्हेकर व सव॔ सन्माननीय सदस्यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या असे श्री.विष्णू वैरागड यांनी कळविले आहे.