सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,आयुक्त,अपंग कल्याण म.रा.पुणे,जिल्हा समाज कल्याण जि.प.परभणी व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी व महात्मा गांधी सेवा संघ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २० फेब्रुवारी २०१९ रोजी जि.प.कन्या प्रशाला परभणी येथे "दिव्यांगअस्मिता अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळख पत्र वाटपासाठी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरासाठी उदघाटनाला मा.श्री.पृथ्वीराज बी.पी. (मुख्यकाय॔कारी अधिकारी जि.प.परभणी) हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे मा.डाॅ.सौ.संध्याताई दूधगावकर (प्राचार्य तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र,परभणी)मा.सौ.एस.के.भोजने (जि.स.क.जि.प.परभणी) मा.श्री.विजयरावजी कान्हेकर (सचिव य.च.प्र वि.के.परभणी) मा.श्री.ढोकणे (गट विकास अधिकारी,परभणी) मा.श्री.आर.जी.गायकवाड (वै.सा.का.जि.प.परभणी) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगाना प्रातनिधिक स्वरूपात वैश्विक काड॔ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परभणी तालुक्यातील २५० दिव्यांगानी वैश्विक ओळख पत्रासाठी नोंदणी केली.या कार्यक्रमासाठी परभणी तालुक्यातील दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी व विशेष शाळेतील कम॔चारी या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.घायाळ सर (विशेष शिक्षक) तर आभार प्रदर्शन मा.श्री.विष्णू वैरागड (समन्वयक,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी) यांनी केले