यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला फोरमतर्फे पॅरा लीगल ट्रेनिंग सर्टिफिकेट कोर्स आयोजित करण्यात आला आहे.

हा ट्रेनिंग कोर्स दिनांक २५ जुलै ते २९ जुलै या कालावधीत होणार आहे. दररोज सायं ५ ते ७ यावेळेत सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्सकरिता नाममात्र शुल्क रुपये १००/- आकारले जातील.

इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्या फक्त ६० जणांना प्रवेश मिळेल, याची नोंद घ्यावी. हा ट्रेनिंग कोर्स पूर्ण झाल्यावर सेंटरच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

सोबत दिलेल्या गुगल फॉर्मवर आपली माहिती भरावी, ही विनंती.

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
25 जुलै 2022
ते
29 जुलै 2022
वेळ : 
05:00
ते
07:00
ठिकाण : 
सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-२१