नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १६ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘वुई हॅव अ पोप’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांच्या चित्रपट मालीकेतील हा प्रसिद्ध चित्रपट आहे. व्हॅटीकन सिटी, ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च पदी असलेले धर्मगुरू पोप. पोपच्या निवडीमागचे राजकारण, पोपच्या भरजरी कपड्यामागे दडलेला सामान्य माणुस असे अनेक पैलु उलगडणारा हा चित्रपट ट्रॅजिकॉमीक आहे. नेहमीप्रमाणे चित्रपट दिग्दर्शक खास भुमिकेत इथेही हजर आहेत. २०११ मध्ये इटली येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १०० मिनिटांचा आहे.
‘वुई हॅव अ पोप’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.