नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १७ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ब्रिटनचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स आयव्हरी यांचा ‘द रिमेन्स ऑफ द डे’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
काझुओ इशिगुरो हे जपानी वंशाचे इंग्रजी लेखक असून २०१७ चे साहित्याचे नोबेल पुरस्काराने त्यांना स्नमानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या ‘द रिमेन्स ऑफ द डे’ ह्या कादंबरीवर आधारीत त्याच नावाचा चित्रपट आहे.
ही एका नेमस्त इंग्लीश परंपरेत घट्टपणे उभ्या असलेल्या बटलरची कहाणी आहे. त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी मिस केंटनची नेमणूक होते. बटलर स्टिव्हन्स मिस केंटनच्या प्रेमात पडतो. पण परंपरा, शिस्त आणि रीती रीवाजाच्या बंधनात त्यांचे प्रेम अव्यक्तच रहाते.
‘द रिमेन्स ऑफ द डे’ १९९३ मध्ये ब्रिटन येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ११४ मिनीटांचा आहे.
‘द रिमेन्स ऑफ द डे’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.