ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांविषयी सातत्याने चर्चा होत असते. त्यांचे आर्थिक प्रश्न, कुटुंबातील स्थान, आरोग्य यांचा समावेश असतो. पण त्याही पलीकडे त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी समाजात अजुनही जनजागृती नाही. याविषयी विचार मंथन व्हावे या उद्देशाने ‘ज्येष्ठ नागरिक व मनाचे आरोग्य’ या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उमेश नागापूरकर यांच्या फेसबुक ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यान शुक्रवार, दि.२९ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे Facebook@Ycpnashik या फेसबुक पेजवर सदर व्याख्यान संपन्न होणार आहे. सदर व्याख्यान प्रतिष्ठानच्या ‘ज्येष्ठ नागरिक मंच’ या उपक्रमांतर्गत संपन्न होणार आहे.