नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ३ फेब्रंवारी २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध कॅनेडियन दिग्दर्शक अॅटम एगोयान यांचा ‘रिमेम्बर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
कॅनेडियन दिग्दर्शक अॅटम एगोयान यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ मध्ये जीवनगौरव हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्शीयन आर्मेनियन वंशाचे एगोयान कॅनेडातील तसेच जागतिक पटलावरचे महत्त्वाचे दिग्दर्शक मानले जातात. ‘‘रिमेम्बर’’ २०१५ मध्ये जर्मनी येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९४ मिनीटांचा आहे.
नाझींच्या अत्याचाराच्या दरम्यान घडलेल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आयुष्यात खूप काही गमावल्यानंतर जगून करायचे काय? या जाणीवेपर्यंत हे कुटुंब येते आणि त्यातून हे नाट्य घडते. गत आयुष्यातील घटनांची, आठवणींची मालिका येथे समोर येते आणि दाहक वास्तवाची प्रचिती देते.
‘रिमेम्बर’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.