नाशिक दि. ४ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि.,नाशिक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट,नाशिक,सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ' चित्रपट चावडी' उपक्रमांतर्गत शनिवार ५ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इराणी अॅनिमेशन दिग्दर्शक मार्जेन सत्रापी हीचा ,पर्सेपोलीस,हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब,ठाकूर रेसिडेन्सी,विश्वास को-ऑप. बँकेसमोर,सावरकरनगर,गंगापूर रोड,नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
चार अॅनिमेशन पटांच्या मालिकेतील हा दुसरा चित्रपट हाही ' वॉल्टझ् विथ बशीर ' प्रमाणे आत्मचरित्रात्मक आहे. १९७९ च्या इराणमधील इस्लामिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर एका छोट्या संवेदनशील, खेळकर मुलीची धीट आणि ध्येयवेडी कहाणी आहे.
ही मुलगी अर्थातच मार्जेन सत्रापी स्वत:च आहे. क्रांतीपर्व इराण हा प्रागतिक होता व एका उचभ्रू घरात रहाणारी मार्जेन अचानकपणे आलेल्या इस्लामिक क्रांतीच्या झंझावाताने हादरून गेली. त्यानंतर ती शिक्षणासाठी फ्रान्समध्ये आली. युरोपमधील मुक्त वातावरण तिला फारसे रूचले नाही. तिला मातृभूमीकडे परतण्याचे वेध लागले. हा तिचा प्रवास वैचारीक आंदोलनाने व भुराजकीय बदलांनी अत्यंत संस्मरणीय होतो. २००८ साली प्रदर्शित झालेल्या या इराणी चित्रपटाचा कालावधी ९६ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील,कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर,सचिव डॉ. कैलास कमोद,कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा,सदस्य सौ. कविता कर्डक,राजवर्धन कदमबांडे,रऊफ पटेल,अॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.