नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मे महिन्याच्या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांसाठी क्लब हाऊस (विश्वास लॉन्स) ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑफ बँकसमोर सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नूकतीच बालनाट्य शिबीराला सुरूवात झाली असून गुरूवारी ११ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत पतंग तयार करणे व शुक्रवारी १२ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत पझल्स तयार करणे याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून हेमंत नाखरे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी १५ मे रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत ओरिनामी कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला हेमंत चोपडे मार्गदर्शन करतील. बुधवारी १७ मे रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत कॅलिग्राफी कार्यशाळा होणार असून चिंतामण पगारे आणि निलेश गायधनी हे मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी २३ आणि २४ मे ला दुपारी ४ ते ७ या कालावधी मध्ये मैत्री गणिताशी या विषयावर हेमंत चोपडे मार्गदर्शन करणार आहेत. गुरूवारी २५ ते सोमवारी २९ मे सकाळी १० ते ३ या वेळेत व्यक्तीमत्त्व विकास व नाट्य या विषयावर संजय हळदीकर, कोल्हापूर हे मार्गदर्शन करतील. शनिवारी २७ मे गजल लेखन कार्यशाळा होणार असून नितिन देशमुख आणि अरूण सोनवणे मार्गदर्शन करतील. ३० व ३१ मे ला सिनेमा कसा बघावा याबाबत समर नखाते (पुणे) हे मार्गदर्शक करणार आहेत.