विश्वास हॅपीनेस सेंटर’ ‘विश्वास ग्रृप’ तर्फे ‘विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमार्तंगत अस्सल चवदार झणझणीत चवींचा मिलाफ असलेला ‘नॉनव्हेज महोत्सव 2017’ चे आयोजन करण्यात आले आहे.विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक,  सारस्वत बँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास लॉन्स,  यांच्या संयुक्त विद्यमाने 25 डिसेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात आला आहे.  सकाळी10 ते रात्री 10 या वेळात विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे संपन्न होत आहे. महोत्सवाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची आहे. महोत्सवाचे संयोजक विनायक रानडे, विवेकराज ठाकूर आहेत. सदर महोत्सवाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर किरण विंचुरकर यांचे ‘भरोसा केटरर्स’ असून सी फूड पार्टनर ‘कोकण करी’ असून, कॅफे पार्टनर ‘कॅफे क्रेम’ इंदिरानगर हे आहेत. वाईन पार्टनर ‘यॉर्क वाईनरी’ हे आहेत. शुद्ध व सात्विक शाकाहारींसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. हे महोत्सवाचे वेगळेपण ठरावे. महोत्सवात स्वादिष्ट मसालेदार मटण, चिकन आणि फिश अशा नॉनव्हेजचे 100 पेक्षा अधिक पदार्थ असणार आहे. त्यात ब्लॅक चिकन लोणचं, मटका चिकन, खपसा, मटका दम चिकन, चिकन पकोडा, लोबस्टर, ऑईललेस तंगडी, चिकन चीज रोट, मंदी चिकन राईस, चिकन दाबेली, चिकन सोसेज, फिश खर्डा, फिश खिमा, फिश बिर्याणी,  फिश टिक्का, कोस्टल साईड फिश तवा फ्राय, फिश मसाला फ्राय, प्रॉन्स चिल्ली, कुझीन फिश पुलीमंची, फिश रवा फ्राय,  मटन, मटन बिर्याणी व सौदी डिशेस, मंगोलियन स्टाईल कोस्टल, शिरकुर्मा आदी पदार्थांची रेलचेल असणार आहे. महोत्सवात उडपी स्पाईस मंगलम, कोकण करी, फातीमा कुकेलू, बिर्याणी हाऊस, यम्मी इट वेल, सोना सी. फुड, अमर किचन, कश्यपी फ्राय नेशन, स्नॅक्स ऑन बोर्ड, तंदुरी जंक्शन, आस्वाद, भरोसा कुल्फी, सोनाली पान दरबार, साई केळी वेफर्स, मलेनाडू ट्रेडर्स, इनफंट एजन्सी, देशपांडे सोलकढी, प्रेरणा ब्रेव्हरेज प्रा.लि., कॅफे क्रिम, सीकेपी फुडस्, होम रिव्हाईज पब्लिकेशन आदींचा समावेश आहे. 

‘विश्वास संकल्प आनंदाचा’ तर्फे ‘मिसळ-सरमिसळ महोत्सव’, ‘नाशिक चौपाटी’  ‘नाशिक फास्ट’,‘नॉन व्हेज महोत्सव’‘भजी महोत्सव’,‘व्हेज बिर्याणी महोत्सव’ आदी वैशिष्टपूर्ण महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला खवय्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.
महोत्सवानिमित्त विश्वास ग्रृप तर्फे उत्कृष्ट गायक/गायिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेचे संयोजक सुप्रसिद्ध संगीतकार संजय गीते आहेत. सदर स्पर्धा महोत्सवाच्या तीनही दिवशी रोज सायं. 6 ते 9 या वेळात विश्वास लॉन्स येथे संपन्न होईल. यात विद्यार्थी-विद्यार्थिंनी, खुल्या गटात महिला व पुरुष अशा एकूण चार गटात स्पर्धा संपन्न होईल. रोजची बक्षिसे रोज दिले जातील. बक्षिस देतांना स्पर्धक उपस्थित असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने गाण्याचा ट्रॅक मोबाईलमध्ये आणावा. परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू विश्वास को-ऑप बँक, भरोसा केटरर्स  यांच्यावतीने देण्यात येतील. नॉनव्हेज महोत्सवात जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक विश्वास ठाकूर, विनायक रानडे 9922225777, विवेकराज ठाकूर 9028089000 यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक