यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक व विश्वास ग्रुपतर्फे खुल्या ऑनलाईन काव्यस्पर्धेचे आयोजन..... नाशिक : बदलणारं सामाजिक वास्तव, प्रश्न, प्रेमभावना यांवर कवी नेहमीच आपला उद्गार सोशल मीडियाला कवितेतून मांडत असता व भाष्य करत असतात. त्याला व्यासपीठ मिळावे म्हणून ङ्कबहर प्रतिभेचाङ्ख या खूल्या ऑनलाईन काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. यासाठी सर्वात आधी स्पर्धकाने https://www.youtube.com/c/YashwantraoChavanPratishthan या लिंकवर जाऊन युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे, कारण पुढील सर्व माहिती वा बदल चॅनेलवर व्हिडिओद्वारे सांगितली जाईल याची नोंद घ्यावी. स्पर्धकाने पाठविलेला व्हिडीओ खालील यु ट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात येईल. स्पर्धकांचा WhatsApp ग्रुप निर्माण करून त्यावर प्रत्येक सहभागी स्पर्धकास युट्यूब चॅनेलवरील त्याच्या व्हिडिओची लिंक पाठवण्यात येईल. सर्वात जास्त Likes, Views असणार्या स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात येईल. स्पर्धेचे नियम व अटी 1. आपली कविता व्हिडीओ स्वरूपात पाठवावी.कविता युट्युब चॅनल वरून प्रसारित केली जाईल. शक्यतो व्हिडिओ क्वालिटी चांगली असावी. कविता स्वलिखित (स्वतः लिहिलेली) असावी. 2. कविता मराठी भाषेतच असावी. 3. मोबाईल आडवा धरून व्हिडीओ तयार करावा. 4. कवितेला कोणत्याही विषयाचे बंधन नाही. पण आशयाकडे लक्ष दिले जाईल. मात्र समाजात तेढ निर्माण होईल असा विषय नसावा. 5. कवीला वयाचे बंधन नाही. 6. व्हिडिओच्या सुरुवातीस स्वतःचे पूर्ण नाव, इयत्ता, शाळा/महाविद्यालय व शहर ही माहिती सांगून कवितेला सुरूवात करावी. 7. राजू देसले-7720052572, सुदर्शन हिंगमीरे-7720052500 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपली कविता पाठवावी. 8. ज्या स्पर्धकास Views व Like जास्त असतील त्यास विजेता घोषित करण्यात येईल. 9. व्हिडीओ 02 मिनिटांपेक्षा मोठा व जास्तीत जास्त 05 मिनिटे असावा. 10. बक्षिसाची रक्कम विजेत्यांना ऑनलाईन पाठविण्यात येईल. 11. स्पर्धा शनिवार 10 ऑक्टोबर ते शनिवार 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत असेल. आपण लवकरात लवकर आपली कविता पाठवाल तेवढा आपल्याला जास्त कालावधी मिळेल. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके खालील प्रमाणे 1. प्रथम क्रमांक (युट्युब वरील सर्वोत्तम लोकप्रिय कवी) : रुपये 2001 व प्रमाणपत्र 2. द्वितीय क्रमांक (युट्युब वरील उत्तम लोकप्रिय कवी) : रुपये 1501 व प्रमाणपत्र 3. तृतीय क्रमांक (युट्युब वरील उदयोेन्मुख लोकप्रिय कवी) : रुपये 1001 व प्रमाणपत्र 4. उत्तेजनार्थ : रुपये 501ची तीन पारितोषिके व प्रमाणपत्र तरी या खुल्या ऑनलाईन स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे, डॉ. स्मिता मालपुरे-वाकेकर, सौ. ज्योती पावरा यांनी केले आहे.