रसिकांसाठी अविस्मरणीय संगीतानुभव – मैफलीसाठी प्रवेश विनामूल्य नाशिक (दि. ३१) : नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री , नवी ओळख आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी , याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास ग्रृप , विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत ‘ फ्यूजन – २०१९ संगम सप्तकलांचा... ’ या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मैफिल सर्वांसाठी विनामुल्य आहे. मंगळवार, ३१ डिसेंबर २०१९ रोजी सायं. ६ ते ९ या वेळात विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – ४२२०१३ येथे सदर मैफल संपन्न होणार असून कार्यक्रमाची संकल्पना विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांची असून संयोजक मिलिंद धटिंगण हे आहेत. सदर उपक्रमाचे ५ वे वर्ष असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला वेगळे आणि अभिरूची संपन्न कार्यक्रमाची परंपरा विश्वास गृपने राखली आहे. शब्द-सूर-ताल-रंगरेषा या समन्वयातून वैशिष्ठपूर्ण अविष्कार रसिकांना अनुभवास मिळणार आहे. चित्र, शिल्प, गायन, नृत्य अशी ही विविधरंगी मैफल आनंदानुभवच देणार आहे. विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, सारस्वत बँक, फॅरवशी इंटरनॅशनल अॅकेडमी, जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट, स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव (ब.), नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम संपन्न होत आहे. संयोजक – मिलिंद धटिंगण असून गायन, मकरंद हिंगणे, मिलिंद धटिंगण, विवेक केळकर, मीना परूळकर-निकम, शुभंकर हिंगणे करणार आहेत. सहगायिका तन्मयी घाडगे, दिशा दाते, जुई आंबेकर आहेत. नृत्यविष्कार डॉ. सुमुखी अथणी व सहकारी सादर करणार असून नाट्यविष्कार दत्ता पाटील, सचिन शिंदे, लक्ष्मण कोकणे व सहकारी सादर करणार आहेत. चित्र – भारती हिंगणे, शिल्पकला – यतीन पंडीत, तर तबला – नितीन वारे, वाद्यवृंद कलाकार – अमोल पाळेकर, रागेश्री धुमाळ, शुभम जाधव, जयंत पाटेकर, दिनेश पडाया हे आहेत. संहिता व निवेदन – किशोर पाठक यांची असून ध्वनी व्यवस्था व प्रकाश व्यवस्था – सचिन तिडके यांची आहे. तरी या मैफिलीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व समन्वयक – विनायक रानडे, डॉ. मनोज शिंपी यांनी केले आहे.