यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आज दि. २५ जुलै २०२३ (मंगळवार) रोजी आश्रमशाळा मोहपाडा ता.सुरगाणा येथील इ. १ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना 'म्युझियम आपल्या दारी' योजनेत शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद मोहपाडा येथील ८० विद्यार्थ्यांना व शिंदे दिगर तसेच जिल्हा परिषद व गिरीजादेवी आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांना ह्या प्रदर्शनाचा लाभ झाला.
फिरते वस्तुसंग्रहालय टिमच्या आत्रेयी चक्रवर्ती मॅडम, सदस्या शांतीनी सुतार व सर्व टीमने मुलांना वस्तुसंग्रहालयात कशाचे प्रदर्शन आहे याची माहिती प्रथम दिली. ध्वनी हा प्रदर्शनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. हे विद्यार्थ्यांना समजून सांगीतले, पुरातन वस्तू, ध्वनी, मानवाचा प्रवास हे विषय प्रदर्शनात मांडले आहेत.
विद्यार्थ्यांना पुरातत्त्व शाखेत करिअर संधी आणि शिक्षकांना ऐतिहासिक वारसा, वस्तू व वास्तू यांचा अध्यापनात वापर याचे विशेष सत्र आयोजित केले. सुरगाणा तालुक्यातील 30 पेक्षा जास्त शाळांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यशवंतराव चव्हाण सेंटरचे मान्यवर सी.ई.ओ. दीप्ती नाखले, मा. दत्ता बाळसराफ, मा.योगेशजी कुदळे, मा.भूषण काळे इत्यादी मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस व यशवंतराव चव्हाण सेंटर नाशिकचे अध्यक्ष मा.नितीनजी ठाकरे साहेब, कळवण-सुरगाणा तालुका संचालक मा. रवीबाबा देवरे आणि संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्व उपक्रमासाठी संस्थेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.लोखंडे सर व माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.ढोके सर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष गौळी व श्री. दीपक कणसेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.