निसर्गाशी मैत्री म्हणजे उत्तम आरोग्य व सकारात्मक जगण्यासाठी भरपूर उर्जा असलेला मार्ग आहे. त्याचा अंगीकार केल्यास जीवन आनंदी व सुदृढ होऊ शकते,त्यासाठी निसर्गाच्या सोबतीने रोजच्या दिवसाचे नियोजन करा. आहारात भाजीपाला व फळे तसेच नैसर्गिक वनस्पतींचा वापर करावा,असे प्रतिपादन सेंद्रीय शेती,आयुर्वेद तज्ज्ञ व उद्योजक नितूबेन पटेल यांनी केले.
समाजात आरोग्य,कृषी क्षेत्राच्या आधुनिकतेविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मेक वर्ल्ड बेटर या सामाजिक संस्थेतर्फे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते,त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सदर व्याख्यानात त्यांनी स्वयंपाक घरातूनच आहाराचे नियोजन,घरगुती आयुर्वेदिक औषधांपासून आजारांची मुक्ती तसेच मायग्रेन,थॉयरॉईड, सर्व्हायकल ,स्पॉन्डिलायटिस,त्वचेचे विकार,निद्रानाश तसेच तणावावर नियंत्रण,तसेच कान,नाक,डोळे अशा अनेक आजारांपासून सुटका आदी विषयावर मार्गदर्शन केले.,यावेळी त्यांनी जीवन व्यवहारात महत्वाची भूमिका बजावणार्या वनस्पती औषधांची माहिती दिली. केसांवरील आजारांसाठी भृंगराज,नाकाच्या विकारांसाठी देशी गायीचे तुप,सर्व्हायकल ,स्पॉन्डिलायटिस, साठी एरंडेल तेल,मातीच्या लेपाची उपचार पद्धती तसेच किडनीवरील आजारांसाठी राजमा,बी.12 ,साठी शेवगा उपयुक्त असल्याचे त्यांनी नमुद केले. अॅसीडीटी व अल्कलाईनचा जीवनशैलीवर परिणाम अग्नीहोत्राचा उपयोग आदी विषयांवर सोप्या भाषेत विचार मांडले व उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.