चित्रपट चावडी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ग्लेनगरी ग्लेन रॉस नाशिक (दि. २०) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ चित्रपट चावडी ’ उपक्रमांतर्गत शुक्रवार, २० डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स फोले यांचा ‘ ग्लेनगरी ग्लेन रॉस ’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे. चित्रपट चावडीत विविध नाटकांवर आधारीत चित्रपट दाखविण्यात येत आहेत. त्यातला हा दुसरा चित्रपट. त्यातील हा चित्रपट नाटककार डेव्हिड मॅमेट यांच्या ‘ पुलित्झर ’ पारितोषिक सन्मानित ‘ ग्लेननरी ग्लेन रॉस ’ या नाटकावर आधारीत आहे. एका रिअल इस्टेट मध्ये नोकरीस असलेल्या विक्रेत्यांना येणार्या संकटांचा सामना या चित्रपटात दाखविण्यात आलेला आहे. अस्थिर जगण्यातून येणारी हतबलता आणि त्यातून लढण्यासाठी येणारे बळ हे या चित्रपटाचे सुत्र आहे. ४९ व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा जागतिक प्रिमियर आयोजित करण्यात आलेला होता. हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी १०० मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.