नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक, व एमआयटी पुणे, यांच्या वतीने चित्रपट रसग्रहण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट अभ्यासक प्रा. समर नखाते यांनी, सहज आणि सोप्या भाषेत संपूर्ण सिनेमातील दृश्य चौकट, दिग्दर्शन,संगीत,अवकाश आणि कॅमेऱ्याचा उपयोग या विविध पैलूंचे साभिनय सादरीकरण करून नाशिककरांची मने जिंकली तर डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रिकरणाच्या वेळी एकेक शॉट घेताना उदभवणारी संकटे,चित्रपटासाठी वापरण्यात येणारे फिल्मचे प्रकार आणि चित्रपटाची प्रकाशयोजना या विषयी रंजक आणि उदबोधक माहिती दिली.