नाशिक : भारतीय स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील देशविकास घडविण्यासाठी प्रेरणा देणारा दिवस असून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा अभिमान दिवस आहे. लोकशाही मूल्ये जोपासू व भारताला महासत्ता बनवू असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता हुतात्मा चौक, गंगापूर रोड येथून रॅलीला प्रारंभ झाला. गंगापूरनाका, के.टी.एच.एम. महाविद्यालय, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, हुतात्मा स्मारक सीबीएस येथे रॅलीचा समारोप झाला. त्यावेळी मा. विश्वास ठाकूर यांनी राज्यघटनेच्य़ा सरनाम्याचे सामुहिक वाचन केले. भारतमातेच्या वेशातील मुलगी सजविलेल्या रथात विराजमान झालेली होती.

यावेळी उपस्थित युवकांनी देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. रॅलीत नामदेव महाराज संस्था, सिंहगर्जना ढोल पथक, ज्ञान अमृत बहुउद्देशीय संस्था अशा अनेक संस्थांनी व अमर भागवत, सुनिल जगताप, योगेश कापसे, मंदार ठाकूर, प्रितम भामरे, शौनक गायधनी, विद्यासागर घुगे, भूषण काळे, कैलास सुर्यवंशी, पवन माळवे अशा अनेक युवकांनी सहभाग नोंदविला.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक