नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २० ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऑरसन वेल्स यांचा ‘द सिटीझन केन’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
‘द सिटीझन केन’ हा चित्रपट अनेक वर्ष जागतिक सिनेमाच्या सर्वोच्च स्थानावर आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून याचा लौकीक आहे. ही कथा चार्ल्स फॉस्टर केन या एका अतिश्रीमंत आणि प्रभावशाली वृत्तपत्राच्या मालकाची आहे. मृत्यूसमयी केन ‘रोझ बड’ हा शेवटचा शब्द उच्चारतो आणि मृत्यूनंतर पत्रकार त्याचे अर्थ लावतात. सिटीझन केन म्हणजे या शब्दाचा अर्थ लावण्यासाठी केलेली धडपड आहे. तसेच एका माणसाचा उत्कर्ष आणि पतन याची रोमहर्षक अशी करूण कहाणी आहे. सन १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या अमेरिकन चित्रपटाचा कालावधी १२० मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.