यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,विभागीय केंद्र नाशिक यांच्या वतीने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ,बालनाट्य शिबिराचे,आयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींच्या जडण घडणीत शिक्षणाला जसे महत्त्व आहे तसे आजच्या जगात सभाधीटपणा,संभाषण कला,निरीक्षण क्षमता,एकाग्रता,सुप्त गुणांचा विकास,स्वत:ला सादर कसे करावे,सांघिकतेचे महत्त्व आदि विषयांचा समावेश असलेली शिबिरे गेली अनेक वर्षे समाजातील विविध स्तरातील मुला-मुलींसाठी लक्ष्मी पिंपळे घेत असतात. सदर शिबीर अभिनय व मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून घेतले जाते.
क्ष्मी पिंपळे यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये अभिनय केला असुन त्यात खंडोबाच लगीन,क्रांतीचक्र,प्लाइंग क्वीनस्मॅ,न वुमन अ‍ॅण्ड नेबर,ब्रेकींग न्यूज,दि बुद्धा,दर्दे डिस्को,माय डिअर शुभी,तिरथ मे तो सब पानी’ अशा अनेक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. अनेक साहित्यकृतींचे अभिवाचन केले आहे. पिंपळे या भरतनाट्यम् विशारद आहेत.
सदर शिबीर ८ वर्षापुढील मुला-मुलींसाठी असून बुधवार १५ मे ते बुधवार २२ मे २०१९ या कालावधीत सायं. ५ ते ८ या वेळेत क्लब हाऊस (विश्वास गार्डन),ठाकूर रेसिडेन्सी
, विश्वास को-ऑप. बँकेसमोर,सावरकरनगर,गंगापूर रोड,नाशिक येथे संपन्न होणार आहे. शिबीराच्या संपर्कासाठी व अधिक माहितीसाठी राजू देसले-७७२००५२५७२, सचिन हांडे-७७२००५२५५९,ज्ञानेश्वर शिरसाठ-९६०४०६१७५८,विनायक रानडे-९९२२२२५७७७यांच्याशी संपर्क साधावा. या बालनाट्य शिबिरास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील,कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर,सचिव डॉ.कैलास कमोद,कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा,सदस्य सौ.कविता कर्डक,राजवर्धन कदमबांडे,रऊफ पटेल,अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक