नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने कॅलिग्राफी (सुलेखन) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅलिग्राफी सुलेखन कार्यशाळा मंगळवार, १५ ते गुरूवार १७ मे २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळात सुप्रसिद्ध सुलेखनकार नंदू गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. देवनागरी व इंग्रजी भाषेतील अक्षरांविषयी, सुलेखनाविषयी यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अक्षरांचे सौंदर्य, लेखनातील सहजता व पद्धती यांविषयी सप्रयोग माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य पुरविण्यात येणार आहे.
सदर शिबीर १० वर्षांपुढील सर्वांसाठी असून क्लब हाऊस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे. शिबिराच्या संपर्कासाठी व अधिक माहितीसाठी राजू देसले ७७२००५२५७२, सचिन हांडे ७७२००५२५५९, ज्ञानेश्वर शिरसाठ ९६०४०६१७५८, विनायक रानडे ९९२२२२५७७७ यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.