महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने कवितेचा जागर होणार असून त्यात नाशिक व परिसरातील नवोदित व ज्येष्ठ कवी कवितेचा जागर करणार आहेत. बुधवार दि. १ मे रोजी सकाळी १० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब ,ठाकूर रेसिडेन्सी,विश्वास को-ऑप. बँकेसमोर,सावरकरनगर,गंगापूर रोड येथे हे खुले कवी संमेलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिक,विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट,नाशिक,ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ,विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे.,कवी संमेलनात नारायण सुर्वे कवी कट्टा,नाशिक कवी,काव्य मंच नाशिक,माझी कविता परिवार,संवाद नाशिक आणि नाशिकमधील सर्व कवी सहभागी होणार आहेत. कवी संमेलनाचे सुत्रसंचलन कवी रविंद्र मालुंजकर हे करणार आहेत. तरी या कवी संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील,कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर,सचिव डॉ.कैलास कमोद यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक