नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २१ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक सेबस्टन लेलिओ यांचा ‘अ फन्टॅस्टिक वूमन’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
मरीना नावाची एक स्त्री जी गायक व वेट्रेस म्हणून काम करते. एक दिवस क्लबमध्ये ऑरलांडो नावाच्या एका व्यावसायिकाच्या ती प्रेमात पडते. त्यानंतर मरीनाच्या वाढदिवशी ऑरलांडोचे अकस्मात निधन होते. त्यानंतर विलक्षण नाट्य पडद्यावर साकार होते. स्त्रीचे जगणे, तिचे अधिकार, स्वातंत्र यांवर हा सिनेमा नेमका भाष्य करतो.
बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल २०१७ मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा व टेडी पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झाला आहे. चिली येथे प्रदर्शित झालेल्या ‘अ फन्टॅस्टिक वूमन’ या सिनेमाचा कालावधी १०४ मिनीटांचा आहे.
‘अ फन्टॅस्टिक वूमन’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.