महाराष्ट्रातील संतांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करुन देशासमोर आदर्श उभा केलेला आहे त्यामूळे आपल्या भूमीस संतांची भूमी म्हटले जाते असे प्रतिपादन खा. हेमंत पाटील यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राच्या वतीने 'रिंगण' संत परिसा भागवत विशेषांक प्रकाशन सोहळया प्रसंगी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राच्या भूमिका सभागृहात रिंगण प्रकाशन सोहळा ता २३ जुलै रविवारी रोजी सायं. ६ वाजता संपन्न झाला. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईचे कार्यक्रम संयोजक व अभ्यासक दत्ता बाळसराफ, राज्य समन्वयक निलेश राऊत, रिंगणचे संपादक सचिन परब, गोदावरी उद्योग समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, व्यंकटेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते रिंगण संत भागवत परिसाचे प्रकाशन झाले. यावेळी सचिन परब यांचा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आहेर देऊन सन्मान करण्यात आला.

मुंबई वरून आलेले कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ मनोगत व्यक्त करताना संत साहित्य परंपरेची सचिन परब यांनी केलेली विवेकी चिकित्सा महत्वपूर्ण आहे असे म्हटले. गेल्या पंधरा वर्षापासून राज्याला समृध्द करणा-या वेगवेगळया संताच्या कार्यावर प्रकाश टाकणारा रिंगण विशेषांक संत साहित्याचा “संदर्भ ग्रंथ” म्हणून नावारूपाला आल्याखेरीज राहणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. रिंगणचे संपादक सचिन परब यांनी आपल्या भावना व्यक्त करताना गेल्या अनेक वर्षांपासून संत साहित्याचे निर्मळ मनाने अध्ययन आणि संकलन करून 'रिंगण' विशेषांक विठुरायाच्या चरणी अर्पण करीत आहोत. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने रिंगणचे होऊ घातलेले प्रकाशन मोठा बहुमान असल्याचेही यावेळी परब यांनी म्हटले. रिंगण विशेषांकावर व्यंकटेश चौधरी यांनी भाष्य करीत धांडोळा घेतला. राज्य समन्वयक निलेश राऊत यांनीही रिंगणाच्या प्रयत्नात सुरुवातीपासून सहभागी होऊन “खारीचा वाटा” उचलण्याचा प्रयत्न करतो असे ते म्हणाले.

यावेळी रिंगण प्रकाशन सोहळ्याला नांदेड शहरातील जाणकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी अंबूलगेकर तर बापू दासरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वतीतेसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेडच्या सदस्या सौ.कल्पनाताई डोंगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मनोरमा चव्हाण, नरसिंग आठवले, डॉ.अनिल देवसरकर, डॉ.शुभांगी पाटील, माधव माधसवाड, शिवाजी अंबूलगेकर, बापू दासरी, मनोहर बसवंते, ओमकार पाटील, शिवाजी गावंडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी नांदेड येथील सुप्रसिद्ध आर्टिस्ट व्यंकट पाटील आणि व्यावसायिक महेश होलानी यांचा यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे सत्कार करण्यात आला.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नांदेड