यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूर
कार्यवृत्त १ जून २०१६ ते ३० सप्टेंबर, २०१६

"दलित गीतिकाव्य" लोकार्पण समारंभ
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूर व आकांक्षा प्रकाशन, नागपूरच्या संयुक्त वतीने मराठी काव्य क्षेत्रात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविणा-या दलित कवींच्या गीति-काव्याचा चिकित्सक अभ्यास, डॉ. शालिनी तेलरांधे यांच्या 'दलित गीतिकाव्य' या ग्रंथात करण्यात आला. एका अलक्षित विषयावरील या मौलिक ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन बुधवार दि. ८ जून, २०१६ रोजी सायं ६.०० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे करण्यात आले.

डॉ. शशीकला वंजारी- सत्कार समारंभ...
मा. डॉ. शशीकला वंजारी यांची मुंबई येथील एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्या वतीने सत्कार समारोहाचे आयोजन रविवार दि. १० जुलै, २०१६ रोजी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक नागपूर येथे करण्यात आले.
हा सत्कार सोहळा संस्कृतच्या अभ्यासक व सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध अग्रणी मा. डॉ. रुपाताई बोधी यांच्या शुभहस्ते व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलुगुरु मा. डॉ. शरद निंबाळकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

मुक्तचर्चा-आजच्या शिक्षणव्यवस्थेतील अपप्रवृत्तीला जबाबदार कोण ?
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्या वतीने शिक्षक आमदार श्री. नागो गाणार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. ३० जुलै २०१६ रोजी सायं ५.३० वाजता कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक नागपूर येथे "आजच्या शिक्षणव्यवस्थेतील अपप्रवृत्तीला जबाबदार कोण? या विषयावरील मुक्तचर्चेचे आयोजन करण्यात आले.

"डॉ. सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार सोहळा -२०१६

विदर्भातील ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा पुरस्कार यंदा 'अज्ञातवासातील कवी' म्हणून प्रसिद्धी पराङ्मुख असलेले. उत्तमोत्तम काव्यरचना करणारे ज्येष्ठ कवी अॅड आजनकर, वरुड जि. अमरावती यांना सुलभाताईंच्या स्मृतिदनी रविवार दि. ३१ जुलै, २०१६ रोजी सायं ५.०० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक नागपूर येथे कृतज्ञतापूर्वक प्रदान करण्यात आला.
हा सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरचे अध्यक्ष मा.डॉ. गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मा. श्री. किशोर रोही यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ कवी मा. श्री. किशोर पाठक (नाशिक) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली डॉ. सुलभा हेर्लेकर स्मृती बहुभाषिक कविसंमेलन झाले. याप्रसंगी हिंदी, उर्दू व मराठीतील मान्यवर कवी डॉ. सागर खादीवाला (हिंदी), जमील अंसारी (हिंदी ) डॉ. मोहम्मद असदुल्लाह (उर्दू) , तौहीदुल हक (उर्दू) मनीषा साधू (मराठी), लोकनाथ यशवंत (मराठी) सहभागी झाले.

"आजचा सुधारक" परिसंवाद व मतभिन्नता विशेषांकाचे प्रकाशन - दि. २१ ऑगस्ट २०१६
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि आजचा सुधारक यांच्या संयुक्त विद्यमाने 'आजचा सुधारकच्या' 'मतभिन्नता' विशेषांकाचे प्रकाशन व 'आजच्या भारतीय समाजात वेगळे मत मांडण्याचा अवकाश आक्रसत चालला आहे का ? ह्या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम अर्थतज्ज्ञ प्रा. श्रीनिवास खांदेवाले, आणि वक्ते ज्येष्ठ संपादक श्री. ल. त्र्यं जोशी, तरुण पत्रकार श्री. जगदीप हार्डीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. २१ ऑगस्ट २०१६, सायं ५.३० वाजता श्री बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला.

प्रकाशन समारंभ - रविवार दि. ४ सप्टेंबर २०१६
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्या वतीने सुप्रसिद्ध कवयित्री सुचिता कातरकर यांच्या "तुमबिन तुझ्याविना" व स्व मधुकर कातरकर यांच्यावरील हिंदी-मराठी हायकु संग्रह "सांजसावळी" (काव्यसंग्रह) भाग-२ या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन रविवार दि. ४ सप्टेंबर २०१६ रोजी सायं ५.३० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे करण्यात आले.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष मा. डॉ. गिरीश गांधी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत मा. डॉ. अक्षयकुमार काळे व ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. बाळासाहेब कुळकर्णी हे प्रमुख वक्ते म्हणून तसेच ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. श्यामकांत कुळकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात स्वर साधनाचे अध्यक्ष मा. श्री. श्याम देशपांडे व ज्येष्ठ निवेदक मा. श्री. प्रकाश एदलाबादकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाशनानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांच्या निवडक सुमधुर गीतांवर आधारीत कार्यक्रम "मधुघट" चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची संकल्पना सुचित्रा कातरकर, निर्मिती प्रा. पद्मजा सिन्हा, निवेदन श्री. प्रकाश एदलाबादकर यांचे होते. याप्रसंगी अश्विनी लुले, विजय देशपांडे, प्रा. द्मजा सिन्हा, ऋचा येनूरकर, निसर्गराज आणि सुचित्रा कातरकर हे गायक कलाकार तसेच विजय देशपांडे, परिमल जोशी विनय ढोक, स्मिता देशपांडे हे वादक कलाकार उपस्थित होते.

सभेचे आयोजन - सोमवार दि. १२ सप्टेंबर, २०१६
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नागपूर विभागाच्या वतीने केंद्राच्या कार्यक्रमासंदर्भात तसेच पुढील उपक्रमाच्या संदर्भात विचारविनीमय करण्यासाठी सोमवार दि. १२ सप्टेंबर, २०१६ रोजी सायं ५.०० वाजता विभागीय केंद्र कार्यालय, राष्ट्रभाषा संकुल शंकरनगर चौक, नागपूर येथे मा. श्री. गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले.

'विंदांची त्रिपदी' - दि. १६ व १७ सप्टेंबर, २०१६
नव्या पिढीत काव्याची गोडी निर्माण व्हावी. जगण्याची उमेद आणि नवी दृष्टी मिळावी. रसिकांना मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कृत कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेतील तत्त्वचिंतन, जीवनदृष्टी कळावी आणि रसगहण अधिक चांगले व्हावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागय केंद्र. नागपूरच्या वतीने दि. १६ व १७ सप्टेंबर २०१६ रोजी 'विंदांची त्रिपदी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विंदांच्या कवितेतील 'त्रिपदी' आनंद करंदीकर आणि रसिता आवाड वाचन-विवेचनाच्या व दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्यात आल्या.
दि. १६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या सहकार्याने अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसरातील 'ग्रामगीता भवन' येथे तसेच दि. १७ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ९.३० वाजता काँग्रेसनगर मधील धनवटे महाविद्यालयातील जनसंवाद विभागाच्यावतीने सेमिनार हॉलमध्ये 'विंदांची त्रिपदी' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

सत्कार समारंभ - दि. २८ सप्टेंबर, २०१६
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्या वतीने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड) चे सदस्य म्हणून नागपूरातील तीन व्यक्तिंची निवड झाल्याबद्दल मा. सौ. माधुरी अशिरगडे, मा. सौ. प्रगती मानकर व मा. श्री. संजय भाकरे यांच्या सत्काराचा कार्यक्रम बुधवार दि. २८ सप्टेंबर, २०१६ रोजी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे सायं ५.३० वाजता आयोजित करण्यात आला.
हा सत्कार समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र, नागपूरचे अध्यक्ष मा. डॉ. गिरीश गांधी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष मा. श्री. प्रफुल्ल फरकसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे ज्येष्ठ समीक्षक मा. डॉ. अक्षयकुमार काळे उपस्थित होते.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नागपूर