यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत होण्यासाठी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार, दि. १४ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ११.०० वाजता ‘ युवा स्वातंत्र्य ज्योत ’ कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संविधान चौक, नागपूर येथे करण्यात येत आहे. करिता आपणास विनंती करण्यात येते की, उपरोक्त ‘ युवा स्वातंत्र्य ज्योत ’ कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.