यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद मेळाव्यात बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी, केवळ रहिवासी न राहता समाजाला काहीतरी देणारा ‘उत्तम नागरिक’ होण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या विजया शिंदे (ठाणे), कमल बारुळे (बीड), ज्ञानेश्वर खरात (पुणे), सोमनाथ गवस (कोल्हापूर) आणि विनायक बोराळे (अकोला) यांना 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार' प्रदान करण्यात आला, तर संस्था पातळीवरील सन्मान जळगावच्या ज्येष्ठ नागरिक संघास मिळाला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांनी सुगम संगीत, नृत्य अशा विविध गुणदर्शन उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंद लुटला.>