सस्नेह निमंत्रण,
यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्यावतीने "शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी आणि सेतू अभ्यासक्रम" या विषयावर शिक्षणकट्टा आयोजित करण्यात आला आहे.
नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. कोविडच्या काळात विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आहे, त्याचा परिणाम आपणांस जाणवायला लागला आहे. याच संदर्भाने राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विविध उपक्रमाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासोबत त्यांची अध्ययन वृद्धी वाढावी यासाठी सरकारने चालू वर्षे 'गुणवत्ता वृद्धी वर्ष' म्हणून जाहीर केले आहे. सोबतच 'सेतू अभ्यासक्रम' बंधनकारक केला आहे.
याच विषयावर चर्चा करण्यासाठी शिक्षण कट्टयाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मा.विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे. यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. श्री मच्छिंद्र बोऱ्हाडे, नंदादीप विद्यामंदिर, गोरेगाव. सौ.दीपिका गावडे, महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे हे आपले अनुभव मांडणार आहेत.
या कट्ट्यावर शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ,अभ्यासक, पत्रकार, पालक यांना सहभागी होता येईल. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नाव, शाळेचे नाव, व्यवसाय मोबाईल नंबर खालील संपर्क ध्वनीवर पाठवावे. ही विनंती.
डाॅ.वसंत काळपांडे,
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर.
नोंदणीसाठी संपर्कध्वनी -
अजित तिजोरे - +918097617020
तुषार म्हात्रे - +919820344394
जयवंत कुलकर्णी - +919833209561
योगेश कुदळे - +919370799791
शिक्षण कट्टा समन्वयक, मुंबई.