यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई तर्फे,पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हवामानात होत चाललेला बदल, झाडांची होणारी कत्तल, बांधकामे, एकूणच या सर्व हासाला कारणीभूत ठरणा-या मानवी कृती आटोक्यात आणता याव्यात याविषयी व्याख्याते अतुल देऊळगावकर यांनी भावी पिढीला हवामान बदलाविषयी जागृकता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. या गोष्टीचा गंभीर विचार करायचा असेल तर याविषयीच गांभीर्य येणा-या पिढीला कळायला पाहिजे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.