औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र,औरंगाबाद व मराठवाडा साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जीवनविषयक कार्याचा वेध घेणार्या रेखाचित्र दालनाचा उद्घाटन समारंभ आदणीय यशवंतराव चव्हाण यांच्या 33 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येस शुक्रवार, दि. 24 नोव्हेंबर 2017 रोजी सायं. 5 वा. आयोजित केला आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांच्या हस्ते होणार असून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, नंदकिशोर कागलीवाल, मुकुंद भोगले, मधुकरअण्णा मुळे, सचिन मुळे, दादा गोरे, कुंडलीक अतगिरे ,सुनिल किर्दक, दासू वैद्य, बिजली देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित या प्रदर्शनात एकूण 28 रेखाचित्रे असून, त्यामध्ये शिवनेरी गडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या प्रतिमेचे अनावरण प्रसंगाची चित्र मालिका, महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्या गेला त्या प्रसंगाची चित्रमालिका त्याच बरोबर संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी व राज्यनिर्मितीचा आनंद सोहळा असे एकूण 28 रेखाचित्रांमधून मा. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जीवनपट या चित्र मालिकेत उलगडून दाखविण्यात आला आहे. सदरील चित्रप्रदर्शन कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय केंद्र औरंगाबादचे सचिव नीलेश राऊत, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर,डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव, रेणुका कड,श्रीकांत देशपांडे,मंगेश निरंतर,गणेश घुले,मयूर देशपांडे आदींनी केले आहे.