छत्रपती संभाजीनगर - मराठी साहित्यातील महान कवी व गीतकार,पद्मश्री ना. धों.महानोर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. महानोर यांच्या कविता आणि गीतांनी संपूर्ण मराठी मनांना मागील पाच दशके मंत्रमुग्ध केले. महानोर यांची जन्मभूमी व कर्मभूमी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ! त्यांच्या स्मृतींना आदरांजली देण्यासाठी शहरातील विविध संस्थांच्या वतीने ' पक्षी दूर देशी गेलं ' या काव्य आदरांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास देशाचे माजी कृषिमंत्री व महानोर यांचे जवळचे स्नेही पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या कविता व गीतांचे सादरीकरण होणार आहे. प्रसिद्ध कवी दासू वैद्य, प्रकाश होळकर (लासलगाव), संजीवनी तडेगावकर (जालना) व शिव कदम हे महानोर यांच्या कवितांचे वाचन करतील. तर प्रसिद्ध गायक राहुल खरे व मालविका दीक्षित (पुणे) हे महानोर यांनी रचलेल्या गीतांचे गायन करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन समाधान इंगळे करणार आहेत.

या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, एमजीएम विद्यापीठ,मराठी विभाग - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा साहित्य परिषद,मराठवाडा आर्ट,कल्चर व फिल्म फाऊंडेशन,अभ्युदय फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे.

मंगळवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२३ | वेळ - सायं. ६.३० वाजता

स्थळ - रुक्मिणी सभागृह,एमजीएम कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद