यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) व एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय व स्कुल ऑफ फिल्म आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'चित्रपट चावडी' या उपक्रमात बहुचर्चित 'भाई का बड्डे' या शॉर्ट फिल्मचे आणि 'कडूबाई' या डॉक्युमेंटरीचे या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. एमजीएम कॅम्पस येथील चित्रपती व्ही.शांताराम प्रेक्षागृह येथे शुक्रवार, दि.२३ जून २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता सदरील माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

‘कडुबाई’ हा ओमेय आनंद दिग्दर्शित लघुपट मराठवाड्यातील प्रसिद्ध लोकगायक ‘कडुबाई’ यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच विविध महोत्सवात अनेक पुरस्कार पटकावणारा ‘भाई का बड्डे’ हा लघुपट उमेश घेवरीकर यांनी दिग्दर्शित केलेला असून कैलास वाघमारे यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबरच चावडी मध्ये विशेष उल्लेखनीय भारतीय चित्रपट सुध्दा दाखवले जातात. सगळीकडे गाजत असलेले ‘कडुबाई’ आणि ‘भाई का बड्डे’ या दोन्ही लघुपटातील कलावंत आणि तंत्रज्ञांबरोबर बघणे हा एक वेगळा अनुभव असणार आहे. तरी या प्रदर्शनास रसिकांनी उपस्थित राहावे.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद
दिनांक : 
23 जून 2023
ते
23 जून 2023
वेळ : 
06:00
ते
08:00