औरंगाबाद : जगभरातील व देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दि. ९ ते १३ जानेवारी २०१९ रोजी आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवास उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नोंदणीस सोमवार,दि. १७ डिसेंबर २०१८ रोजी पासून सुरवात होणार आहे. जगभरातील चाळीस सर्वोत्कृष्ट सिनेमे, मास्टर क्लास,परिसंवाद,उदघाटन व समारोप सोहळा औरंगाबाद च्या नागरिकांना अनुभवता येणार आहे.याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता पाच दिवसांसाठी केवळ चारशे रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ दोनशे रुपयांत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. सोमवार, दि. १७ डिसेंबर २०१८ पासून प्रतिनिधी नोंदणी सुरवात होणार असून १) आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल २)नाथ सीड्स,पैठण रोड ३)एमजीएम फिम्स आर्टस् डिपार्टमेंट, एमजीएम परिसर ४) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड ५) विशाल ऑप्टिकल्स,पवन गॅस एजन्सी समोर,उस्मानपुरा ६) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा ७) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टॅण्ड ८) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा ९) जिजाऊ मेडिकल, टि.व्ही. सेंटर या केंद्रांवरती चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल. औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम,महोत्सवाचे संचालक अशोक राणे, सचिन मुळे,सतीश कागलीवाल,प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद, उद्योजक उल्हास गवळी,आकाश कागलीवाल,बिजली देशमुख आदींनी केले आहे.