यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - विभागीय केंद्र,औरंगाबाद व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित औरंगाबाद शहरा कचराकोंडी जागर संवाद आज संपन्न झाला.याप्रसंगी पद्मश्री डॉ.शरद काळे,विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर,महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम,कोषाध्यक्ष सचिन मुळे,घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, विश्वस्त डॉ.भालचंद्र कांगो,बिजली देशमुख, सुनील किर्दक,दै.सकाळ चे कार्यकारी संपादक संजय वरकड,विजय कान्हेकर,सुहास तेंडुलकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी औरंगाबाद शहराच्या प्रश्नावर मूलभूत मांडणी केली.प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. दुसऱ्या सत्रात स्त्री मुक्ती संघटना मुंबई,स्वच्छ पुणे,एमजीएम क्लीन इंडिया सेंटर,सीआरटी,औरंगाबाद कनेक्ट टीम,वायू मित्र या संस्थांनी आपण करत असलेल्या यशस्वी प्रयोगांची मांडणी केली. औरंगाबाद शहरात मागच्या दीड महिन्यापासून घुमसत असलेल्या कचऱ्याच्या प्रश्नावर शहरात पहिल्यांदा लोकप्रतिनिधी,प्रशासन,संस्था,संघटना,सामाजिक कार्यकर्ते,प्रसार माध्यमे,सर्वसामान्य नागरिक यांचा सुसंवाद झाला,हे या कार्यक्रमाचे यश म्हणता येईल.यात मान्यवरांनी सुचविलेल्या पर्यायावर आगामी काळात अजून चर्चा करण्यात येईल,तसेच जे प्रत्यक्ष या प्रश्नाच्या सोडवनूकीसाठी कार्य करीत आहे, त्यांना अजून भरभक्कम साथ देण्याचा मनोदय प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकारी मंडळाने व्यक्त केला आहे.