शवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद , महात्मा गांधी मिशन व शिक्षण विकास मंच यांच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण मसुदा- २०१९ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन रविवार दि. २३ जून २०१९ रोजी करण्यात आलेले आहे. जेएनईसी महाविद्यालयात सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान हे चर्चासत्र संपन्न होईल. शिक्षणतज्ज्ञ आणि मुख्य संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे , शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. बी.बी.चव्हाण , प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुभाष कांबळे , शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सुरजप्रसाद जैस्वाल , विविध शाळांचे मुख्याध्यापक , प्रयोगशील शिक्षक , स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अभ्यासक , पालक , पत्रकार या चर्चेत सहभाग नोंदवणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणातील चांगल्या तरतुदी कोणत्या आहेत ? कोणत्या तरतूदीचा अजून अंतर्भाव यात असावा ? कोणत्या तरतूदी बरोबर नाहीत त्यात काय बदल व्हावा ? यासंदर्भात या चर्चेत विचार व्यक्त केले जाणार आहे. तसेच या चर्चेत अंतिम झालेल्या मुद्दांचा गोषवारा केंद्र शासनाला या धोरणाच्या मसुद्याबाबतचा अभिप्राय म्हणून कळविला जाणार आहे. या चर्चासत्रात सहभाग मर्यादीत व निःशुल्क असून केवळ नोंदणी करणार्या प्रतिनिधींनाच सहभागी होता येणार आहे. नोंदणीसाठी ०२४०-२३५१७७९ अथवा ९८२३०६७८७९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम , कोषाध्यक्ष सचिन मूळे , सचिव नीलेश राऊत , सदस्य डॉ. श्रीरंग देशपांडे , डॉ. भालचंद्र कांगो , प्रा. अजीत दळवी , प्रा.दासू वैद्य , डॉ.मुस्तजीब खान , डॉ.अपर्णा कक्कड , बिजली देशमुख , डॉ.रेखा शेळके , विजय कान्हेकर , सुहास तेंडुलकर , सुबोध जाधव , रेणुका कड , विनोद सिनकर , रुपेश मोरे , राजेंद्र वाळके आदींनी केले आहे.