औरंगाबाद (दि.१३) : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या वतीने लोकसंवाद उपक्रमांतर्गत 'पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ' या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.नुकत्याच उत्तर प्रदेश,पंजाब,मणिपूर,गोवा व उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये निवडणूका संपन्न झाल्या व त्यांचा निकालही जाहीर झाला.या निवडणुकांचे वैशिष्ट्य काय होते ? प्रचारात कोणते मुद्दे चर्चिले गेले ? मतदान टक्केवारी,जनतेचा मूड काय होता ? त्याचा निकालावर परिणाम कसा झाला या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने या व्याख्यानमालेत उहापोह होणार आहे.
सोमवार दि. १४ ते बुधवार दि.१६ मार्च २०२२ दरम्यान सदरील व्याख्यानमाला दररोज सकाळी अकरा वाजता आईन्स्टाईन हॉल,जेएनईसी महाविद्यालय,एमजीएम कॅम्पस,येथे संपन्न होणार आहे.प्रवेश सर्वांसाठी खुला असेल.
सोमवार, दि.१४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वा. 'उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक' या विषयावर संजय मिस्किन (पत्रकार व राजकीय विश्लेषक,मुंबई) हे मार्गदर्शन करतील.
मंगळवार, दि.१५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वा. 'पंजाब व मणिपूर विधानसभा निवडणूक' यावर श्री.सुनील तांबे (ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक,मुंबई) हे मार्गदर्शन करतील.
बुधवार, दि.१६ मार्च २०२२ सकाळी ११ वा. 'गोवा व उत्तराखंड विधानसभा निवडणूक' या विषयावर श्रीकांत देशपांडे (राजकीय अभ्यासक,औरंगाबाद) हे मार्गदर्शन करतील.
या सर्व व्याख्यानांना नागरिकांनी उपस्थिती रहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. अपर्णा कक्कड, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर,डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर,सुबोध जाधव, रेणुका कड आदींनी केले आहे.