वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. याच समारंभात मराठवाड्यातील तीनही साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.अकादमी पुरस्कार विजेते लेखक मा.आसाराम लोमटे (परभणी),प्रा.रवी कोरडे (औरंगाबाद) व डॉ.वीरा राठोड (औरंगाबाद) यांचा सत्कार संपन्न होईल.

उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १.३० वा. राज्यातील प्रसिद्ध शिक्षक साहित्यिकांची 'माझ्या लेखन प्रेरणा' हि प्रकट मुलाखत घेण्यात येईल. निशाणी डावा अंगठाकार प्रसिद्ध साहित्यिक मा. रमेश इंगळे उत्रादकर (बुलडाणा), प्रसिद्ध साहित्यिक मा. कृष्णात खोत (कोल्हापूर ), प्रसिद्ध साहित्यिक मा. प्रविण बांदेकर (सिंधुदुर्ग ), प्रसिद्ध साहित्यिक मा. संजीवनी तडेगावंकर या नामवंत शिक्षक साहित्यिकांच्या मुलाखती मा. केशव खटिंग (परभणी) व मा. संदीप जगदाळे ( औरंगाबाद) हे घेतील.

यानंतर दुपारी तीन वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले असून 'शिक्षकांचे सोशल मिडीयावरील सृजनशील लेखन' या विषयावरील परिसंवाद संपन्न होईल. या सत्राच्या अध्यक्षा मा. प्रज्ञा देशपांडे (नागपूर) या असतील तर मा. अनिल सोनुने (जालना), मा. वृषाली विनायक (मुंबई ), मा. भाऊसाहेब चासकर (अहमदनगर) हे शिक्षक प्रतिनिधी या सत्रात आपले विचार व्यक्त करतील. मा. रुपेश मोरे (औरंगाबाद) हे या सत्राचे संचालन करतील.

या सत्राबरोबरच आईन्स्टाईन हॉल येथे दुपारी तीन वाजता 'कवी कट्टा' या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असून, राज्यभरातून आलेल्या शिक्षक कवींना या कट्ट्यावर आपल्या कविता सादर करता येतील.

सायंकाळी पाच वाजता निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे आयोजन आलेले असून, प्रसिद्ध कवी मा. अशोक कोतवाल ( जळगाव ) हे या सत्राचे अध्यक्ष असतील, मा. चंद्रशेखर मलकमपट्टे (लातूर) व मा. भारत सातपुते (लातूर ) हे कवी संमेलनाचे संचालन करतील. मा. अरुण पवार ( बीड) मा. गोविंद पाटील (कोल्हापूर ), मा शब्बीर शेख (औरंगाबाद), मा. सतिष दराडे (अकोला), मा. कविता नरवडे ( जालना), मा. स्वाती शिंदे पवार (सातारा), मा. अनिल साबळे (पुणे), मा. आशा पैठणे, मा. सुनंदा कांबळे ( सिंधुदूर्ग ), मा. कैलास दौंड ( अहमदनगर), मा. कविता मोरवणकर (मुंबई), मा. राजेंद्र दिघे (नाशिक), मा. मनिषा घेवडे (मुंबई), मा. जिजा शिंदे (औरंगाबाद), मा सलील सिद्धीकी (लातूर), मा. अप्पा जगताप (हिंगोली), मा. लतिका चौधरी (धुळे ), मा. तृप्ती अंधारे (उस्मानाबाद), मा. माधव सुर्यवंशी (मुंबई ), मा. इंद्रजित घुले (सोलापूर), रविंद्र मालूंजकर (नाशिक), मा. बालाजी फड (धुळे), मा. लता गुठ्ठे (मुंबई), मा. शिवदास पोटे (हिंगोली), मा. सुरेश हिवाळे (परभणी), मा. प्रमोद माने (उस्मानाबाद ) मा. बी.एन. चौधरी (जळगाव), मा. मैत्रेयी केळकर (मुंबई ), मा. अशोक कोळी ( जळगाव), मा. मोहन कुंभार (सिंधुदुर्ग ) मा. शेषराव धांडे (वाशिम), मा. हरीष हातवटे (बीड), मा. सारिका उबाळे (अमरावती) हे सहभागी होतील. रात्री साडे आठ वाजता प्रा. अशोक जोंधळे निर्मिती 'खान्देशचा मळा, मराठवाड्याचा गळा' हा काव्यसंगीतावर आधारित सुप्रिसद्ध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.

संमेलनाच्या दुस-या दिवशी दि. १६ एप्रिल २०१७ रोजी सकाळी नऊ वाजता कथाकथन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. नामवंत शिक्षक कथाकार या सत्रात आपला सहभाग नोंदवतील. मा. एकनाथ आव्हाड (मुंबई), मा. बाबासाहेब परीट (सोलापूर) मा. संभाजी आंधळे (धुळे), मा. अनिता येलमटे (लातूर) हे आपल्या कथा या सत्रात सादर करतील. मा. बबन माळी (औरंगाबाद ) हे या सत्राचे संचालन करतील.

सकाळी साडे दहा वाजता 'पाठ्यक्रमातील साहित्याची निवड व निकष' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मा. श्रृती चौधरी (पुणे) या सत्राच्या अध्यक्षा असतील तर मा. गजानन पळसुळे देसाई (रत्नागिरी), मा. विठ्ठल भुसारे (परभणी) व मा. सोमनाथ वाळके (बीड) हे मान्यवर या सत्रात आपले विचार व्यक्त करतील. मा. विनोद सिनकर (औरंगाबाद) हे या सत्राचे संचालन करतील.

दुपारी बारा वाजता 'वाचन संस्कृतीशी मुलांना जोडण्यासाठी शिक्षकांची भुमिका' या विषयावरील परिसंवाद संपन्न होईल. मा. नरेंद्र लांजेवार (बुलडाणा) हे या सत्राचे अध्यक्ष असतील. मा. शिवाजी अंबुलगेकर (नांदेड), अरविंद शिंगाडे (बुलडाणा) व फारुख काझी (सोलापूर) हे मान्यवर या सत्रात आपले विचार व्यक्त करतील. मा. दयानंद कांबळे हे या सत्राचे संचालन करतील.

दुपारी तीन वाजता या संमेलनाचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध साहित्यिक मा. रंगनाथ पठारे हे या समारोप सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शन करतील. यावेळी संमेलनाध्यक्ष मा. बालाजी मदन इंगळे, स्वागताध्यक्ष मा. आ. विक्रम काळे, स. भु. शिक्षण संस्थेचे सहचिटणीस मा. डॉ. श्रीरंग देशपांडे, एम.जी.एम.चे विश्वस्त मा. प्राचार्य प्रताप बोराडे, डॉ. अपर्णा कक्कड यांची प्रमुख उपस्थिती असेल. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकवणा-या आणि ललित किंवा शैक्षणिक विषयावर लेखन करणा-या शिक्षकांना या संमेलनात सहभागी होता येईल. नाममात्र प्रतिनिधी शुल्कात निवास, भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या शिक्षकांना या संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी हा ईमेल पत्ता स्पॅमबॉट्सपासून संरक्षित केला जात आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला JavaScript सक्षम करणे आवश्यक आहे. या मेल आयडीवर अथवा अभ्युदय फाऊंडेशन, कासलीवाल सुवर्णयोग, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड, गारखेडा परिसर, औरंगाबाद - ४३१००५ (दूरध्वनी क्र. ०२४०-२३५१७७९ ) येथे संपर्क साधावा.

संमेलनात सर्व साहित्यप्रेमी व शिक्षक साहित्यिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, संमेलनाचे कार्यवाह नीलेश राऊत, आयोजन समितीचे विजय कान्हेकर, डॉ. दासू वैद्य, डॉ. कैलाश अंभुरे, डॉ. वीर राठोड, सौ. शुभांगी काळे, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. महेश अचिंतलवार, सुबोध जाधव, दिलीप सुर्यवंशी, रुपेश मोरे, विनोद सिनकर, राजेंद्र वाळके, गणेश घुले, एच.बी. सोमवंशी, बबन माळी, धर्मराज शिंदे, पी.जी. राजपूर, पी.जी. डोणगावे, एन.सी. कवडे आदींनी केले आहे.

 

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद