औरंगाबाद (दि.३०) : देशातील अभ्यासू व कर्तृत्ववान नेतृत्व मा.खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबाद च्या वतीने औरंगाबाद शहरात, केवळ माणुसकीच्या नात्याने शासनाकडून कुठलाही निधी न घेता शेकडो मृत कोरोना रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार करणाऱ्या मोईन मस्तान ग्रुपच्या सदस्यांचा 'कोविड मुक्ती धाम योद्धे ' म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. जवाहर कॉलनी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात हा सोहळा कोविड बंधने पाळून संपन्न झाला.केंद्राचे कोषाध्यक्ष सचिन मुळे यांच्या हस्ते सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.मोईन मस्तान ग्रुपच्या सदस्यांनी कुठल्याही मृत व्यक्तीची जात,पात, धर्म,पंथ,भाषा न बघता मनोभावे अंत्यविधी केले.औरंगाबादच्या सर्व रुग्णालयांमध्ये ते अविरत सेवा प्रदान करीत होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले व मोईन मस्तान ग्रुपच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रास्ताविक केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांनी केले,शिव कदम,के.के जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.तर श्रीराम पोतदार व गणेश घुले यांनी खा.सुळे यांनी काव्यरूपी शुभेच्छा दिल्या.संचलन महेश अचिंतलवार यांनी तर आभार सुबोध जाधव यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश निरंतर,दीपक जाधव,ज्ञानेश बोद्रे,प्रतीक राऊत,अक्षय गोरे,रायभान शिसोदे,प्रदीप धाडगे, ज्ञानेश्वर वडकर आदींनी परिश्रम घेतले.